सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'तो' वादग्रस्त निर्णय अखेर मागे...
X
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'एसपीपीयू ऑक्सी पार्क'या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर आता हा निर्णय परत घेतला जाणार आहे. या निर्णयाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाने विद्यापीठाच्या आवारात व्यायाम करण्यासाठी पैसे मोजावे लागणार होते. विद्यापीठाने तसा आदेशच जारी केला होता. विद्यापीठाच्या या आदेशाचा स्टुडंट हेल्पींग हँडचे, अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी विरोध केला होता. या संदर्भात त्यांनी मॅक्समहाराष्ट्रकडे 'विद्यापीठाला लागले भिकेचे डोहाळे ?'
https://www.maxmaharashtra.com/news-update/now-pune-university-to-charge-rs-1000-per-month-from-morning-and-evening-walkers-922672 लागले आहेत. अशा शब्दात आपली भूमिका मांडली होती.
त्यानंतर आता हा सरकारने हा निर्णय मागे घेत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'एसपीपीयू ऑक्सी पार्क'या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल.
— Uday Samant (@samant_uday) June 12, 2021