पुण्यात पीक विम्यासाठी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक, इफ्को टोकियो कंपनीचं ऑफीस फोडलं
X
पुणे येथील इको टोकियो पीक विमा कंपनी चे ऑफिस संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकाच्या संदर्भात या कंपन्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा दिला नसल्यानं संतप्त शिवसैनिकांनी हे ऑफिस आज सकाळी अकराच्या सुमारास फोडले आहे.
रब्बी आणि खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरुन देखील अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळे संतप्त पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कॉम्युटर, खुर्च्या यांची तोडफोड केली आहे.
शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या र्यालयाची तोडफोड केली. वारंवार कंपनीकडे अर्ज विनंत्या करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येत नव्हती, त्यामुळं हे तीव्र आंदोलन करण्यात आलं असल्याचं मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने राज्यभरात अश्याच पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही मोरे यांनी दिलाय.