Home > News Update > चंद्रमणी जाधव लिखित "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना" पुस्तकाचा प्रकाश सोहळा संपन्न

चंद्रमणी जाधव लिखित "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना" पुस्तकाचा प्रकाश सोहळा संपन्न

चंद्रमणी जाधव लिखित डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना पुस्तकाचा प्रकाश सोहळा संपन्न
X

बाजारात व्यक्तिमत्व विकासाची हजारो पुस्तके मिळतात. मात्र, कोट्यावधी भारतीयांचं लोकशाही राज्य घडवण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना" या विषयावर कोणीही पुस्तक लिहिल्याचं पाहायला मिळत नाही. म्हणून लेखक चंद्रमणी जाधव यांनी भारतीय युवकांच्या उर्जेचा आणि प्रेरणेचा स्रोत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून प्रत्येक तरुणाने आपलं व्यक्तिमत्व तपासावं आणि परिक्षण करावं. अशा या पुस्तकाचा उद्देश आहे.

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि मॅक्समहाराष्ट्र चे मुख्य संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री अविनाश महातेकर, कृष्णा मिलन शुक्ला, गौतम सोनवणे, राहुल भंडारे, शिरीष रामटेके, प्रकाश मोरे, प्रकाश जाधव, राजरत्न ठोसर उपस्थित देखील उपस्थित होते.

Updated : 8 Aug 2021 5:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top