राज्य सरकार कडून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Jan 2024 9:43 AM IST
X
X
अयोध्येत प्रभू रामाच्या प्रतिष्ठापनेला स्थापनेला अवघे २ दिवस उरले आहेत. २२ जानेवारीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. (22 January 2024 holiday in Maharashtra)
राज्य शासनाने यावर राज्यपालांच्या आदेशानुसार पत्रक काढल आहे. त्या पत्रकात म्हटले आहे की " भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांया वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे २२ जानेवारी २०२४ श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचं सांगितेले आहे.
Updated : 20 Jan 2024 11:23 AM IST
Tags: Ram Mandir ayodhya ram mandir State Govt Pm Modi visit to Ayodhya Public succession January 22
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire