Home > News Update > PM Narendra Modi मोदींच्या पोस्टवर लोकं श्रद्धांजली का वाहत आहेत ?

PM Narendra Modi मोदींच्या पोस्टवर लोकं श्रद्धांजली का वाहत आहेत ?

PM Narendra  Modi मोदींच्या पोस्टवर लोकं श्रद्धांजली का वाहत आहेत  ?
X

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरा आहे. शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन पंतप्रधान मोदी हे आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. महाराष्ट्रातील ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामांचे शुभारंभ करणार असल्याची पोस्ट समाजमाध्यांमावर महाराष्ट्र डीजीआयपीआर कडून करण्यात आली आहे. यावर अनेकांनी निगेटीव्ह कमेंट केल्या आहेत. मोदींजीच्या या दौऱ्यावर अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र डीजीआयपीआर म्हटलं आहे की "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (दि.२६ ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, करणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन, ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अंतर्गत लाभाचे वितरण तसेच निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. अशा पद्धतीची पोस्ट समाज माध्यमांवर करण्यावर आली आहे. दरम्यान भाजपवर आणि मोदींनवर जनता नाराज असल्याचं दिसून आलं आहे.

महाराष्ट्र डिजीआयपीआरच्या या पोस्टवर लोकांनी भावपूर्ण श्रध्दांजली असं लिहत अनेकांनी कमेंट केल्या आहेत, तर सोयाबीन कापसाची माती करणारे महान व्यक्तीमहत्व तर अनेकांनी सद्या चालू असलेल्या मराठा आरक्षण मुद्दा काढतं तुम्हा सर्व राजकीय नेत्यांना मराठा समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली म्हणतं पोस्ट केल्या आहेत.















Updated : 26 Oct 2023 11:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top