'विधवा महिलांना अर्थसहाय्य करताना घातलेली अट रद्द करा'- घुले
X
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत कोरोना काळात ज्या महिलांचे पती कोरोना संसर्गाने बाधित होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे अशा विधवा महिलांना महिला व बालकल्याण योजने अंतर्गत 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर केले जात आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 50 वर्षे पर्यंत असावे अशी अट घालण्यात आली आहे ही अट रद्द करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपाच्या उपमहापौर हिराबाई घुले यांनी आयुक्तांकडे केली आहे.
घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब उध्वस्त होतं, ही बाब लक्षात घेऊन ज्या महिलांचे वय 50 पेक्षा जास्त आहे अशा सर्व विधवा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका उपमहापौर घुले यांनी व्यक्त केली आहे.
या योजनेतील अट शिथिल केल्यास जास्तीत जास्त विधवा महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांच्या कुटुंबास हातभार लागणार आहे. असे उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.