Home > News Update > राहुरी कारखान्याच्या 'त्या' कामगारांना भल्या पहाटे अटक

राहुरी कारखान्याच्या 'त्या' कामगारांना भल्या पहाटे अटक

राहुरी कारखान्याच्या त्या कामगारांना भल्या पहाटे अटक
X

राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रवरेच्या कामागारास काळे फासले प्रकरणी गुन्हा दाखल असलेले तनपुरे कारखान्याच्या सहा आंदोलक कामगारांस राहुरी पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. या नंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

इंद्रभान पेरणे,सचिन काळे,सिताराम नालकर,नामदेव शिंदे,सुरेश तनपुरे,बाळासाहेब तारडे असे पोलिसांनी अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी आज मंगळवारी पहाटे ही कारवाई केली आहे.

डॉ. तनपुरे कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नासाठी कामगारांनी कारखाना परिसरात तब्बल 14 दिवस आंदोलन सुरू ठेवले होते. त्यानंतर अनेकांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. कामगारांच्या मागण्या मान्य होत नसल्याने संतप्त कामगारांनी डॉ. तनपुरे कारखान्यात काम करणाऱ्या लोणीच्या प्रवरा कारखान्याचे कामगार अविनाश दिनकर खर्डे ,राहणार भगवतीपुर यांच्या तोंडास काळे फासले होते. दरम्यान खर्डे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी इंद्रभान भाऊसाहेब पेरणे ,सचिन गोपाळ काळे,सिताराम शिवराम नालकर,नामदेव बापू शिंदे ,सुरेश पाराजी तनपुरे,बाळासाहेब माधव तारडे,व इतर चार ते पाच अनोळखी कामगिरांवर गु.र.नं कलम १७३०/२०२१भादवि कलम ३२६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान संबंधित आंदोलक कामगारांना अटक होणार नाही असे आश्वासन सत्ताधारी विखे यांनी दिल्याचे कामगार आंदोलकांनी सांगितले होते. मात्र, सोमवारी पहाटे राहुरी पोलिसांनी आंदोलक कामगारांना अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान विखे गटाचे आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले गटाचे समर्थक राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी कामगारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की, ही अटक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने सांगितलेले नाही, त्यामुळे कामगारांना आश्वासन दिले गेले असताना नेमकी कामगारांशी कुणी दगा केला? किंवा राजकिय हेतू साध्य करण्यासाठी कुणी कामगारांना अटक करण्यास भाग पाडले का? अशी जोरदार चर्चा राहुरी शहरात रंगली आहे.

Updated : 7 Sept 2021 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top