सिडनी टेस्टमध्ये अदानींच्या नावाने दोघांची बॅटिंग
X
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट दौऱ्या दरम्यान पहिल्या कसोटीचा पहिला दिवस दोन जणांनी गाजवला. पण हे दोघेही कुणी क्रिकेटर नाहीयेत तर ते दोघं होते आंदोलनक आणि त्यांनी अदानी उद्योग समुहाविरोधात क्रिकेटच्या मैदानात उतरुन बॅनरबाजी केली. कसोटी सामना सुरू होताच काही प्रेक्षक हातात 'State Bank of India No $1B Adani Loan' असे बॅनर घेऊन मैदानात घुसले आणि त्यांनी आपला विरोध दर्शवला. बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने त्यांना मैदानाबाहेर काढले. या प्रकारामुळे क्रिकेट मैदानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे कुणी थेट मैदानात घुसत असेल तर त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पण या प्रकारामुळे अदानी समुहाला ऑस्ट्रेलियात विरोध का होत आहे अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. मैदानात बॅनर घेऊन घुसलेल्या आंदोलकांनी घातलेल्या टीशर्टवर पुढच्या बाजूने "#StopAdani आणि मागच्या बाजूने Stop Coal. #StopAdani. Take Action" असे लिहिले होते. ऑस्ट्रेलियामध्ये अदानी समुहाविरोधात कोळसा खाणीवरुन पर्यावरणवाद्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या प्रकल्पाला कोर्टात आव्हानही देण्यात आले होते. पण कोर्टाने अदानी समुहाच्या बाजूने निर्णय दिला होता.