Home > News Update > नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना गिफ्ट ; 500 स्क्वेअर फूट पर्यंततच्या घरांचा मालमत्ता कर माफ

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना गिफ्ट ; 500 स्क्वेअर फूट पर्यंततच्या घरांचा मालमत्ता कर माफ

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना गिफ्ट ; 500 स्क्वेअर फूट पर्यंततच्या घरांचा मालमत्ता कर माफ
X

मुंबई : नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरविकास विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईतील 500 स्क्वेअर फूट पर्यंततच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 2017 च्या मुंबई मनपा निवडणुकीमध्ये आपण एक वचननामा दिला होता. इतर देतात ते जाहीरनामा आणि आपण देतो ते वचननामा. या वचननाम्यातील बहुतांश वचन आपण पूर्ण केलेत. त्यातील एक वचन म्हणजे मुंबईतील 500 स्क्वेअर फूट घरांच्या मालमत्ता कर रद्द करणं. हे वचन आम्ही पूर्ण करत आहोत. या निर्णयामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळालाय.

दरम्यान, हा निर्णय घेताना मला खूप आनंद होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तत्काळ या निर्णयाची घोषणा नाही तर मला अंमलबजावणी हवी आहे. जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मुंबईकरांच्या 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले होते त्यानुसार आपण निर्णय घेत आहोत. हा निर्णय मुंबईकरांसाठी खूपच दिलासादायक आहे. 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर सरसकट माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय महाराष्ट्रातच नाही तर देशातही कुणी घेतला नसेल. या निर्णयामुळे मुंबईतील 16 लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल.

Updated : 1 Jan 2022 4:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top