Home > News Update > नागपुरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नागपुरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नागपुरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
X

नागपूर : दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे, त्यामुळे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपुरात यंदा तलावात गणेश विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख भागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे.

सोबतच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर देखील उभारण्यात आले आहे. तर गणेश विसर्जनाच्या काळातच मुंबई, दिल्ली मध्ये दहशतवादी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नागपूर शहर पोलीसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागपूर शहरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

तलावात गणेश विसर्जन करण्यास बंदी असल्याने शहरातील तलाव सील करण्यात आले असून तिथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोबतच फिरते मूर्ती संकलन वाहन शहरातून फिरण्यात येणारआहे. निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश देखील ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींकडून तलाव परिसरात निर्माल्य गोळा करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि शांततेत गणेश विसर्जन पार पडावं यासाठी नागरिकांनी प्रशासनसला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Updated : 19 Sept 2021 10:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top