'मागेल त्याला शेततळे' योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करा :भुमरे
X
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि 'मागेल त्याला शेततळे' या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumare) फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ ( Increase in farmer income ) करणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ( Bhausaheb Fundkar Orchard Planting Scheme) राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत, आशा सूचना यावेळी भुमरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो का, याबाबत अहवाल सादर करावा. तसेच फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी,असेही या बैठकीत भुमरे म्हणाले.
तर, रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मंत्री भुमरे यांनी घेतला.