Home > News Update > दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळ

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळ

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळ
X

मुंबई // टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी मोठा धक्का बसला आहे. भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. सराव करताना रोहितच्या हाताला दुखापत झाली. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहितला लागला होता. त्यामुळे रोहित शर्माच्या जागेवर प्रियांक पांचाळ याला संधी देण्यात आली आहे. प्रियांक पांचाळनं दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, त्यामुळं त्याला संधी देण्यात आली आहे.

प्रियांक पाचाळ हा भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ सलामीवीर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 100 मॅचेस खेळल्यात. पांचाळनं आतापर्यंत 7 हजार धावा केल्या असून त्यानं 24 शतकं केली आहेत. तर 50 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यात त्याची नाबाद 314 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

प्रियांकनं त्याच्या नेतृत्त्वात गुजरातला 2016-17 मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिलं होतं. प्रियांक मध्यमगती गोलंदाज देखील आहे. त्यानं 22 विकेटस देखील घेतल्या आहेत.पांचाळनं 2016-17 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 542 धावा केल्या होत्या. तर, 2018-19 मध्ये 898 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड होण्याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील त्यानं महाराष्ट्र, केरळ, रेल्वे कडून चांगली कामगिरी केली होती. प्रियांकनं भारत अ संघाकडून खेळताना न्यूझीलंड, श्रीलंका संघाविरुद्ध सेंच्युरी केली होती. प्रियांक पांचाळ शिवाय टीम इंडियाकडे के.एल.राहुल आणि मंयक अग्रवाल हे सलामीवीर आहेत.

Updated : 14 Dec 2021 9:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top