एका खासगी बसमध्ये तब्बल १४४ प्रवासी, लॉकडाऊनच्या नियमांची ऐशीतैशी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Jun 2021 8:46 PM IST
X
X
कोरोनामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन सुरू आहे, पण हे सर्व नियम धाब्यावर बसवत खासगी वाहतूकदार प्रवाशांची अवैध वाहतूक करत असल्याचे उघड झाले आहे. धुळे जिल्हयात मुंबई-आग्रा महामार्गावर लळिंग गावाजवळ दोन लक्झरींमधून जवळपास २६० प्रवाशांना नेले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्य एका बसमध्ये 129 तर दुसऱ्या लक्झरी बसमध्ये तब्बल 144 प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सध्या कोरोनाच्या अनुषंगाने प्रवासी वाहतुकीर निर्बंध आहेत. पण तरीही नियमबाह्य ही वाहतूक केली जात असल्याने धुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक लक्झरी बस मध्यप्रदेमार्गे मुंबई तर दुसरी पुण्याला जात होती. आरटीओ च्या माध्यमातून दोन्ही लक्झरी बसचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
Updated : 4 Jun 2021 8:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire