Home > News Update > हुकूमशाही सरकारविरोधी लढणाऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवणार - पृथ्वीराज चव्हाण

हुकूमशाही सरकारविरोधी लढणाऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवणार - पृथ्वीराज चव्हाण

हुकूमशाही सरकारविरोधी लढणाऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवणार - पृथ्वीराज चव्हाण
X

कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयानंतर दक्षिण कर्नाटक मध्ये मोदी सरकारला स्थान नाही. त्याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही जो मोदी सरकारविरोधी लढणाऱ्या पक्षासोबत आघाडी करून येणाऱ्या निवडणूका 'आम्ही लढणार' असल्याचे काँग्रेस नेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते इस्लामपूर येथे झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघतील वाळवा शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावादरम्यान बोलत होते.

यावेळी माजी सहकार मंत्री विश्वजीत कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमटी माजी अध्यक्ष मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत प्रमुख उपस्थित होते. यावेळी चव्हाण पुढे म्हणाले की "सध्या शिवसेना राष्ट्रवादी मध्ये जे चालले आहे, ते महाराष्ट्र जनतेला आवडलेले नाही. यामुळे कोण कोणच्या पक्षात जातोय हे बघण्यापेक्षा जो मोदी विचारांच्याविरोधात आहे, त्याला सोबत घेऊन लढू नाहीतर 48 जागांवर काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याच चव्हाण यांनी सांगितले. सध्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने पक्ष नियमांचा भंग केला आहे. मात्र काँग्रेस आमदार किंवा नेत्यांनी कधीच शिस्त भंग केली नाही. त्यांनी सतत शेतकरी, बेरोजगार व अन्याया विरुद्ध विधानसभेत आवाज उठवला असल्याचे सांगत वाळवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट राहून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस प्रबळ असल्याचे दाखवून देण्याचे आव्हान केले. तर जनतेने सत्ता दिली असताना मोदी सरकार ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण करत आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. अशी टीका त्यांनी भाजप सरकार वर केली.

Updated : 13 Aug 2023 9:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top