पंतप्रधानांनी स्वतःच प्रथम लस टोचून घ्य़ावी : सचिन सावंत
महाराष्ट्राला जेवढ्या प्रमाणात लस पुरवण्याची गरजेची होती त्यापेक्षा कमी प्रमाणात लस मिळालेल्या आहेत. मात्र पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका असल्याने तिथे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जगभरात लसीच्या प्रभावावर शंका आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांनी प्रथम स्वतः लस टोचून घेऊन तेथील जनतेला एक विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी स्वतःच प्रथम लस टोचून घेतली असती तर चांगलं झालं असत, असे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.
X
कोरोनाचा लस सर्वाना मोफत मिळेल अशी पंतप्रधानांकडून अपेक्षा होती. करोडो लोक हे अत्यंत गरीब आहेत त्यांचं जीवन अगदी निम्न्न स्थरावर आहे आणि या संकट काळात मोठं आर्थिक नुकसान देखील झालं आहे. त्यांना ही लस मोफत दिली असती तर आणखीन चांगलं झालं असत. पंतप्रधानांनी बिहार मध्ये जे आश्वासन दिल होत ते देशपातळीवर दिल असत तर बरं झालं असत असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलेली केलं.
महाराष्ट्र जेवढ्या प्रमाणात लस गरजेची होती त्यापेक्षा त्या कमी मिळालेल्या आहेत. मात्र पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका असल्याने तिथे लस मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आली असून प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडणं हे दुदैवी असल्याची टीका देखील सावंत यांनी यावेळी केली.
जगातळीवर तसेच आपल्या देशात देखील लसीच्या प्रभावावर शंका आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांनी प्रथम स्वतः लस टोचून घेऊन तेथील जनतेला एक विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी स्वतःच प्रथम लस टोचून घेतली असती तर चांगलं झालं असत. पंतप्रधानांनी लोकांपुढे एक आदर्श घालून द्यावं अस देखील ते म्हणाले.