Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंधूंनेच दिला व्यापारांना 'हा' अजब सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंधूंनेच दिला व्यापारांना 'हा' अजब सल्ला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना असा काही सल्ला दिला की त्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे. जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही जीएसटी कर भरू नका? असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंधूंनेच दिला व्यापारांना हा अजब सल्ला
X

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना असा काही सल्ला दिला की त्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे. प्रल्हाद मोदी यांनी व्यापारांना केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला जीएसटी कर भरू नका? मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तुमच्या दारात येतील! असा अजब सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी हे उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या व्यापारी ट्रेड असोसिएशनच्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांना हा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी ते आले होते.त्यावेळी त्यांनी हे व्यक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी दिलेल्या या अजब सल्ल्यानंतर देशात एकच चर्चा रंगली आहे.

प्रल्हाद मोदी म्हणाले की, ते देशभरातील साडे सहा लाख रास्त भाव दुकान मालकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्यास सांगितले, जोपर्यंत त्यांनी केलेल्या विविध मागण्या अधिकाऱ्यांनी मान्य करत नाहीत. तोपर्यंत जीएसटी भरू नका बघा मग मुख्यमंत्री, पंतप्रधान तुमच्याकडे धाव घेतात. असं मोदी यांनी म्हटलं आहे. " नरेंद्र मोदी असो किंवा इतर कोणीही, त्यांना तुमचे ऐकावे लागेल. तुम्ही आधी महाराष्ट्र सरकारला तुमचं निवेदन द्या, आणि ठामपणे सांगा की जोपर्यंत तुम्ही आमच्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आम्ही लोकशाही मध्ये आहोत ... गुलामगिरीत नाही." असं प्रल्हाद मोदी यांनी बोलतांना म्हटलं आहे.

Updated : 31 July 2021 5:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top