Home > News Update > पंतप्रधान मोदींचा नवी मुंबई दौरा : पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ; अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पंतप्रधान मोदींचा नवी मुंबई दौरा : पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ; अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पंतप्रधान मोदींचा नवी मुंबई दौरा : पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ; अवजड वाहनांना प्रवेशबंदी
X

Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी नवी मुंबई येथी ट्रान्स हार्बर लिंक (सागरी सेतू पूल) व इतर विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यासाठी नवी मुंबईत मोदींचे आगमन होणार असल्याने कडेकोट सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळासह संपूर्ण परिसरात व महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. त्यासाठी चार हजारांहून अधिक पोलिस व राखीव बल कार्यरत राहणार आहेत दरम्यान मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना प्रवेशबंदी देखील असाल्यांची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हा सोहळा उलवे येथील विमानतळ परिसरात होणार आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचा चोख आराखडा तयार केला जात आहे. कार्यक्रमस्थळी व मोदींच्या आगमन मार्गावर सुरक्षेची कोणतीही कमी राहणार नाही, याकडे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका देखील घेतल्या जात आहेत.

सभामंडप परिसरात इतरांना प्रवेशबंदी

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून सभास्थळाची पाहणी झाल्यापासून पोलिस त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. सभामंडपाची तयारी सुरू असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतरांना परिसरात प्रवेशबंदी केली आहे.

सभेला एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यासह पंतप्रधान व इतर मान्यवरांच्या सुरक्षेवर पोलिसांकडून भर दिला जात आहे. त्यासाठी ४ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त नेमले जाणार आहेत. त्यामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला मुंबई, ठाणे, पुणे येथील पोलिसांसह राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आदींचा समावेश आहे. दरम्यान नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी व पार्किंगसाठी बंदी घालण्यात देखील घलण्यात आली आहे.

Updated : 11 Jan 2024 1:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top