Home > News Update > Amrit Udyan : राष्ट्रपतींनी बदललं मुघल गार्डनचं नाव, वाचा आता काय असणार नवं नाव?

Amrit Udyan : राष्ट्रपतींनी बदललं मुघल गार्डनचं नाव, वाचा आता काय असणार नवं नाव?

देशातील विविध शहरं आणि स्थळांच्या नामांतराचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. त्यात आता राष्ट्रपती भवन इथल्या ऐतिहासिक ‘मुघल गार्डन्स’ चं (Mughal Gardens)नाव बदलंल आहे.

Amrit Udyan : राष्ट्रपतींनी बदललं मुघल गार्डनचं नाव, वाचा आता काय असणार नवं नाव?
X

देशातील विविध शहरं आणि स्थळांच्या नामांतराचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. त्यात आता राष्ट्रपती भवन इथल्या ऐतिहासिक 'मुघल गार्डन्स' चं (Mughal Gardens)नाव बदलून आता ते 'अमृत उद्यान' (Amrit Udyan) करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी यासंदर्भातला निर्णय घेतलाय. 'गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या मार्गातील आणखी एक निर्णय' अशा शब्दात भाजपनं राष्ट्रपती मुर्मू यांच्या या निर्णयाचं समर्थन करत स्वागत केलंय.

अमृत उद्यानाचं वैशिष्ट्य

नामांतर झालेल्या अमृत उद्यानात १३८ प्रकारचे गुलाब, ११ प्रकारचे टय़ुलिप, ५ हजार मौसमी फुलांच्या प्रजाती यांच्यासह अनेक वैविध्यपूर्ण फुले-झाडे आहेत. इथल्या फुलांना आणि झाडांना 'क्यूआर कोड' देण्यात आले असून मोबाइलवर ते स्कॅन करून अधिक माहिती तात्काळ मिळू शकणार आहे.

राष्ट्रपती भवनामध्ये ईस्ट लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि सक्र्युलर गार्डन अशी चार उद्याने होती. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनी हर्बल गार्डन १ आणि २, बोन्साय गार्डन आणि आरोग्य वन ही नवी उद्यानं विकसित केली. आता यापुढे या सर्व उद्यानांना 'अमृत उद्यान' म्हटलं जाणार आहे. चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांनी एका कार्यक्रमात राजपथ चं नाव कर्तव्यपथ केलं होतं. राजपथ हे गुलामगिरीचं प्रतीक असल्यानं त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात येत असल्याचं मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. याच विचारातून मुघल गार्डन्सचं नामांतर अमृत उद्यान झालंय.

नामांतर झालेल्या 'अमृत उद्यान' ला पाहण्यासाठी ३१ जानेवारी ते २६ मार्च असे दोन महिने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दररोज साडेसात हजार ते १० हजार लोकांना प्रवेश दिला जाईल. २८ ते ३१ मार्च हे अखेरचे चार दिवस अनुक्रमे शेतकरी, अपंग, लष्कर, निमलष्कर आणि पोलीस दलांतील व्यक्ती आणि प्रामुख्याने आदिवासी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

Updated : 29 Jan 2023 12:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top