बालाजी संस्थांकडून मंदिर खुलं करण्यासाठी पूर्व तयारी सुरु
X
कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आली आहे, मात्र आता हे संकट काहीसं कमी झाल्याने राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धर्माची प्रार्थनास्थळे खुली केली जाणार आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील प्रसिद्ध असलेल्या बालाजी संस्थांकडून मंदिर परिसरात पूर्व तयारीला सुरुवात केली आहे, 7ऑक्टोबर पासून इतर प्रार्थना स्थळांसोबत बालाजी मंदिर देखील भाविकांसाठी खुले केले जाणार आहे, ज्यामध्ये मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायजर डिस्पेंसर , थर्मल स्क्रीनिंग, त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग आणि तोंडाला मास्क लावून नियमांचे पालन केले जाणार आहे, मंदिरामध्ये प्रवेश देताना भाविकांना वयाचे कुठलाही बंधन असणार नाही, मात्र सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंतच भाविकांना दर्शनाची वेळ बालाजी संस्थांकडून निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी भाविकांनी राज्य शासनाने घालून दिलेले कोरोना नियम पाळावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आले आहे.