Home > News Update > ...तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचा जयजयकार करणार – प्रवीण तोगडिया

...तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचा जयजयकार करणार – प्रवीण तोगडिया

...तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचा जयजयकार करणार – प्रवीण तोगडिया
X

महागाई आणि बेरोजगारीवरुन सध्या मोदी सरकार टीकेचे धनी ठरत आहे. विरोधक सरकारवर जोरदार हल्ले करत असताना आता विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. वाढती महागाई आणि

आम्ही कोणत्या एका पक्षाचे आता गुलाम नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बेरोजगारीवर विरोधकांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे...देशहितासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाचा आम्ही जयजयकार करण्यास तयार आहोत. भाजपने देशहिताचे काम केले तर त्यांचा जयजयकार करु...उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देशहिताचे काम केले तर त्यांचा जयजयकार करु या शब्दात तोगडिया यांनी मोदींविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि राणे वादावर भाष्य करताना हा वाद गांभीर्याने घेण्याची गरज नाही, राजकारणात असे होत असते, उद्या ते एकत्र येऊन जेवतीलही असे तोगडिया यांनी म्हटले आहे.

Updated : 26 Aug 2021 6:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top