Home > News Update > 'परीक्षा घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयात कुणापर्यंत जातात हे शोधण्याची गरज'- प्रविण दरेकर

'परीक्षा घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयात कुणापर्यंत जातात हे शोधण्याची गरज'- प्रविण दरेकर

परीक्षा घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयात कुणापर्यंत जातात हे शोधण्याची गरज- प्रविण दरेकर
X

मुंबई : राज्यातील विविध परीक्षेतील मोठा घोटाळा सध्या समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता म्हाडाचा पेपर फोडल्याचंही प्रकरण समोर आलं. त्यातच आता महा टीईटी परीक्षेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी सुपे आणि त्याच्या मेहुण्याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना मोठं घबाड मिळून आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही त्याबाबत आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे की,

भरती परीक्षांमधील घोटाळा आणि त्यातून कमावलेले कोट्यवधी रुपये आता जनतेसमोर आले आहेत. असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. मात्र हे सरकार आल्यापासून फक्त आणि फक्त वसुलीच सुरु आहे हे दिसून येतंय. दरम्यान या पेपर फुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचं बोललं जातं आहे, याची दखल घेत हे प्रकरण सीबीआयकडे द्यावं आणि याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधून काढायची गरज आहे, असं दरेकर म्हणाले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती या सर्व प्रकरणातील सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, असं ट्वीट करत फडणवीस यांनी मागणी केली.

Updated : 20 Dec 2021 7:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top