राजकारण थांबवा, लसीकरण निश्चित वेळेतच व्हायला हवं : प्रविण दरेकर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 April 2021 6:04 PM IST
X
X
आज राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. यावर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे.
वेळेतच लसीकरण करा…
निश्चित वेळेत लसीकरण झालं नाही, तर त्यादरम्यान ज्या संकटाला सामोरं जावं लागेल, तेही आपल्याला परवडणारं नाही. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून घेणं. केंद्र सरकारशी वाद न करता समन्वय ठेवणं, खासगी पातळीवर जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घेणं आणि १ मेपासूनच उत्तम लसीकरण करण्याची गरज आहे. कारण ६ महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मुंबईत एक ते दीड लाख लसी उपलब्ध असताना ४० ते ५० केंद्र बंद होती. आता तरी यामध्ये राजकारण करू नका.
असं म्हणत दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
Updated : 28 April 2021 6:04 PM IST
Tags: Pravin Darekar bjp covid vaccine
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire