Home > News Update > पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे वक्तव्य म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम-दरेकर

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे वक्तव्य म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम-दरेकर

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे वक्तव्य म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम-दरेकर
X

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राज्यात घडणाऱ्या या घटनांना गृहखाते जबाबदार असून सरकार या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे. एकामागोमाग एक घटना घडत असतांना सरकारची साधी एक व्यापक बैठक नाही. याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. त्याच बरोबर पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी जो पर्यंत भर चौकात खून होत नाही तो पर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही असे म्हणाले त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम आहे अशी टीका दरेकर यांनी केली आहे.मागच्या आठवडाभरात पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी चार ते पाच खुन झालेत, पुणे शहरात महिना दोन ते तीन महिन्यात 100 पेक्षा जास्त खून झालेत यापेक्षा आणखी कोणत्या भयानक घटनेची वाट प्रशासन आणि सरकार बघत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी महापालिकेत आणलेल्या प्रभाग रचनेत बद्दल देखील प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे.महिला सुरक्षेपेक्षा महाविकास आघाडी सरकारला राजकारण महत्वाचे वाटत आहे, हे सरकार भांबावलेले सरकार आहे, महिला सुरक्षेसाठी हे सरकार कधी ठोस पाउलं उचलणार असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

Updated : 24 Sept 2021 5:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top