Home > News Update > बिहारी मुलासाठी टाहो फोडता.. मग मराठी उद्योजकांच्या पत्नीला रस्त्यावर का यावे लागते? : आमदार प्रताप सरनाईक

बिहारी मुलासाठी टाहो फोडता.. मग मराठी उद्योजकांच्या पत्नीला रस्त्यावर का यावे लागते? : आमदार प्रताप सरनाईक

बिहारी मुलासाठी टाहो फोडता.. मग मराठी उद्योजकांच्या पत्नीला रस्त्यावर का यावे लागते? : आमदार प्रताप सरनाईक
X

आक्रस्ताळी पत्रकारीता करणाऱ्या अर्नब गोस्वामींना अटक झाल्यानंतर समिश्र प्रतिक्रीया येत असताना विधानसभेत अर्नब विरोधात आवाज उठवणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्नबच्या अटकेने नाईक कुटुंबियांनी न्याय मिळाल्याचे सांगत बिहारी मुलासाठी टाहो फोडता.. मग मराठी उद्योजकांच्या पत्नीला रस्त्यावर का यावे लागते? असा प्रश्न भाजपासाठी उपस्थित केला आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता. पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा आरोप त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केला होता.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे. अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावं लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

रायगड पोलिसांसाठी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी केली होती. तसेच ही हायप्रोफाईल केस असल्याने तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथक अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली.

विधानसभेत अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीनेही आपल्याकडे तक्रार केल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख "विधानसभेत आमदार सुनिल प्रभू यांनी अर्णब गोस्वामी त्यांच्याबद्दल एक तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी अर्णब गोस्वामीचा जो रिपब्लिक स्टुडियो आहे, त्याच्या इंटिरिअरचं काम अन्वय नाईक या आर्किटेक्टला दिलं होतं.

त्या अन्वय नाईक यांचे पैसे अर्णब गोस्वामीने दिले नाही. म्हणून अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली. याच्याबद्दलची रितसर तक्रार त्यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी प्रज्ञा नाईक यांनी माझ्याकडे दिलेली आहे. त्याबाबतची चौकशी महाराष्ट्र पोलीस करणार आहे." अन्वय नाईक यांना न्याय मिळावा आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच #JusticeForAnvay अशी मोहीमही सुरू करण्यात आली आहे. विधानसभेत आमदार प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळात अर्नब गोस्वामींविरोधात हक्कभंगही दाखल केला आहे.



Updated : 4 Nov 2020 12:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top