Home > News Update > राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली? राष्ट्रवादीची अधिकृत प्रतिक्रिया

राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली? राष्ट्रवादीची अधिकृत प्रतिक्रिया

राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली? राष्ट्रवादीची अधिकृत प्रतिक्रिया
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यामध्ये झालेल्या भेटीची देशाच्या राजकारणात मोठी चर्चा आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र, तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत.

भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

Updated : 12 Jun 2021 11:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top