NDTV चे मालक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचा राजीनामा, नेमकं काय आहे कारण?
अदानी समुहाने NDTV वर काही शेअर्सवर ताबा मिळवल्यानंतर अखेर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला आहे.
X
अदानी समूहातील तीन कंपन्यांनी NDTV तील 29.18 टक्के शेअर्सचे अप्रत्यक्षरित्या अधिग्रहण केले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीतील 26 टक्के शेअर्स थेट विकत घेण्यासाठी अदानी समुहाने शेअर्स होल्डरकडे 5 डिसेंबरपर्यंतचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर अखेर NDTV ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे माध्यमा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
अदानी समुहातील एएमजी मीडिया नेटवर्क्स, अदानी एंटरप्रायजेस आणि विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी प्रत्येकी 4 रुपये किंमत असलेल्या 1.67 कोटी शेअर्सच्या अधिग्रहणासाठी प्रति शेअर्स 294 रुपयांची किंमत देऊ जेएम फायनान्शिलने देऊ केले होते. त्यानंतर खुल्या प्रस्तावाची घोषणा JM फायनान्शियल लिमिटेडद्वारे ऑगस्ट महिन्यात घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर NDTV च्या माध्यमातून अदानी समूह पत्रकारितेला नख लावत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर NDTV चे प्रवर्तक असलेल्या प्रवण रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आहे.
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या NDTV ची प्रवर्तक कंपनी असलेल्या RRPR होल्डिंग्ज ला कर्ज देणाऱ्या आणि अदानी समुहाचा घटक असलेल्या कंपनीला न फेडलेल्या कर्ज रकमेचे समभागांमध्ये रुपांतर करून NDTV त 29.18 टक्के शेअर्स मिळवण्यासाठी सेबीची मंजूरी आवश्यक ठरेल, असा दावा NDTV ने केला होता. मात्र यानंतर आता थेट NDTV चे संचालक मंडळच बदलल्याने NDTV चा ताबा अदानी समूहाकडे जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे सेबीने कर्जप्रकरणाच्या संदर्भाने 27 नोव्हेंबर रोजी सेबीने NDTV चे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना भांडवली बाजारातील प्रवेश, शेअर्सची खरेदी किंवा विक्री याबरोबरच इतर व्यवहारांना प्रतिबंध केला होता. त्यामुळे सेबीने दिलेली मुदत संपताच NDTV चे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे NDTV अदानी समूहाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे खऱ्या पत्रकारितेचा अंत होत असल्याची भावना लोकांमधून व्यक्त केली जात आहे.