पदोन्नतीमधील आरक्षण रद्द, प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
X
पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे. याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, तसेच बैठक घेण्याची मागणी केली आहे. 7 मे रोजी राज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर, धनराज वंजारी आणि महिला आघाडीच्या रेखा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णय़ावर माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही टीका केली आहे. ऐन कोरोनाच्या काळात अनुसुचित जाती,अनुसुचित जमातींच्या हक्काची ३३ टक्के पदोन्नतीने भरावयाची पदे खुल्या प्रवर्गातुन भरायाच्या निर्णयाचा बडोले यांनी विरोध केला आहे.