Home > News Update > Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ, म्हणाले, सरकार खेळ करतंय..

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ, म्हणाले, सरकार खेळ करतंय..

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ, म्हणाले, सरकार खेळ करतंय..
X

Prakash Ambedkar : सध्या राज्यातील राजकारणात मराठा आरक्षण चर्चेचा विषय बनला आहे. या मुद्यावर सरकार देखील बॅकफूटवर आली आहे. यातच या प्रकरणात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत मराठा आरक्षणसाठी सरकारची प्रामाणिकता नाही. सध्याचं सरकार सर्वसामान्यांशी खेळ करत आहेत. अशी प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्राशी बोलतांना दिली आहे.

मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. ज्यांनी सत्ता भोगली जे सत्तेत आहेत त्यांना चिंता आहे,असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजातील भांडण हे ऐतिहासिक आहे. एकमेकांच्यात भांडण आहेत. मराठा जोपर्यंत रयतेला येत नाही तोवर आरक्षण अवघड आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

तर दुसरीकडे सरकारवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पोटबंदरमध्ये 20 हजार कोटींचं ड्रग्ज पकडले गेलं आहे. त्याचा तपास कुठे कसा सुरू आहे? हे माहिती नाही. पोलीस खात्याने आणि ललित पाटीलने या प्रश्नाचे उत्तर द्यावे जो पर्यंत ते बोलत नाही तोवर आपण बोलून उपयोग नाही, असं आंबेडकर म्हणाले.

आमचं जागा वाटप झालं आहे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेना आणि वंचितची आघाडी झालेली आहे. वंचित आणि शिवसेनेची (उबाठा गट) जागा वाटप झाली आहे, बाकी त्रिकूट बाबत त्यांनी निर्णय घ्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यत देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाबाबत चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

उच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी होती, ती आता 6 नोव्हेंबरला गेली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. रवींद्र शेणगावकर यांनी म्हटलं की फंडिंग आलं आहे. ते बेकायदेशीर आहे. खर्च झाला सगळा पैसा आम्ही हिशोब दिलं आहे. मोघम सगळं त्यांनी दिलं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं आहे.

Updated : 20 Oct 2023 1:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top