Pradeep Mehra : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तरूणाचं भारतीय मीडियाला आवाहन
सोशल मीडियावर हल्ली आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहत असतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला प्रदीप चा व्हिडीओ तुम्हाला जगण्याची प्रेरणा निश्चितच देईल.
X
चित्रपट निर्माते विनोद कापरी हे रात्री 12 वाजता नोएडा येथे आपल्या कारमधून प्रवास करत असताना, 19 वर्षीय प्रदीप मेहरा नावाचा मुलगा आपल्या खांद्यावर बॅग घेऊन एकटाच धावत असल्याचे दिसले. त्यांना वाटले हा मुलगा अडचणीत आहे. त्यामुळे कापरी यांनी त्याला वारंवार गाडीत बस मी तुला सोडतो असं सांगितलं. पण त्याने नकार दिला.
प्रदीप या व्हिडीओत सांगतो की, तो एका कारखान्यात काम करतो. तो सैन्यात भरती होण्यासाठी धावतोय. ही त्याच्या धावण्याची वेळ आहे. त्यानंतर तो खोलीवर जाऊन स्वयंपाक करतो. त्याला सकाळी आठ वाजता कारखान्यात जावे लागते. त्यामुळे सकाळी धावता येत नाही. तो नोएडाला आपल्या भावासोबत राहतो. कापरी यांनी त्याला जेवायला त्यांच्या सोबत चल अशा विनंती केली. तेव्हा प्रदीपने उत्तर दिले की त्याला घरी परत जावे लागेल आणि मोठ्या भावासाठी रात्रीचे जेवण बनवावे लागेल. भाऊ नोकरी करतो. त्याला नाईट शिफ्ट असते. आई-वडील कुठे आहेत, असे विचारले असता प्रदीपने सांगितले की, आईची प्रकृती ठीक नाही आणि तिला रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी देखील हा व्हिडीओ रीट्विट केला आहे.
👌👌👌👌 champions are made like this .. whether on sports field or anything they do in life .. He will be a winner ✅thank you vinod for sharing this .. yes PURE GOLD 🙌 https://t.co/2tzc28nbNu
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 20, २०२२प्रदीप चा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने मीडियाला विनंती केली आहे की त्याला त्यांच्या कामावर फोकस करू द्यावं, त्याला त्रास देऊ नये.
"मेहनत सुनसान होनी चाहिए, कामयाबी का शोर होना चाहिए"
— Vinod Kapri (@vinodkapri) March 21, 2022
ये कहते हुए #PradeepMehra ने मीडिया से अपील की है कि वो उसे उसके लक्ष्य में फ़ोकस रहने दे और परेशान ना करें🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/B6OptUQ8Je