Home > News Update > चौथ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान, काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणार का?

चौथ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान, काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणार का?

उत्तरप्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. तर या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौथ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान, काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणार का?
X

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज २३ फेब्रुवारीला एकूण 59 जागांसाठी मतदान पार पडत आहे. आज पार पडत असलेल्या 59 जागांसाठी 624 उमेदवार मैदानात आहेत. २०१७ मध्ये भाजपने या 59 जागांपैकी 50 जागांवर विजय मिळवला होता. तर एका जागेवर भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या अपना दलाने विजय मिळवला होता. तर 4 जागांवर समाजवादी पक्षाने तर काँग्रेस आणि मायावती यांच्या बहुजन पक्षाला 2 जागांवर विजय मिळवता आला होता. यातील सपा, बसपा आणि काँग्रेस च्या प्रत्येकी एका उमेदवारांने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आज पार पडत असलेल्या 9 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस चा एकेकाळी मोठा दबदबा राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या निवडणूकीत भाजपने या टप्प्यात मोठं यश संपादन केलं होतं. या टप्प्यातील भाजपसाठी पीलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनऊ, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर आणि बांदा या जागा महत्त्वाच्या आहेत.

पुढील टप्प्यामधील निवडणूकीत १६ जागा दलितांसाठी राखीव आहेत. या भागात सपा 57 जागांवर तर ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष उर्वरित दोन जागांवर निवडणूक लढवत आहे. बसपा आणि काँग्रेस सर्व 59 जागांवर निवडणुक लढत आहेत. तर, भाजप 57 जागांवर निवडणूक लढवत आहे तर भाजपचा मित्र पक्ष अपना दल (एस) तीन जागांवर निवडणूक लढवत आहे.

आत्तापर्यंत पहिल्या तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे.

पहिल्या टप्प्यात शेतकरी आंदोलनाशी संबंधीत असलेल्या जाट समाजाचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात मतदान पार पडलं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात मतदान पार पडले होते. तर तिसऱ्या टप्प्यात यादवांचा गड समजल्या जाणाऱ्या मतदार संघात मतदान पार पडले होते.

गेल्या 2017 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र शेतकरी आंदोलन आणि आर एल डी सपा गटबंधनामुळे या तीनही टप्प्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज लखनऊ आणि रायबरेली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. रायबरेली मध्ये गांधी परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हर्च्युअल रॅली घेतली होती. रायबरेली मध्ये खुद्द प्रियंका गांधी यांनी प्रचार केला आहे.

10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात सपा रालोद-गठबंधनला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं बोललं जात आहे. तर भाजपचे नेते भाजपला मतदान मिळाल्याचा दावा करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकुण 7 टप्प्यात मतदान पार पडत आहे आणि 10 मार्च ला निवडणूकीचे निकाल हाती येणार आहेत.

Updated : 23 Feb 2022 12:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top