Adv. ममता ते बंगालची वाघीन, कसा राहिला ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास?
X
'बंगालची वाघीन' असं ज्या ममता बॅनर्जी यांना संबोधलं जातं. त्या ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल कॉंग्रेस पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करताना दिसत आहेत. भाजपने या ठिकाणी सर्व ताकद लावून देखील या ठिकाणी भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपने या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी केंद्रातील मंत्र्यांना खासदारांना मैदानात उतरवलं होतं. या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केंद्रीय यंत्रणांचा मोठ्या खुबीने वापर केला. ममता बॅनर्जी यांचे अनेक आमदार भाजपमध्ये घेतले. तरीही या ठिकाणी ममता पराभूत करण्यात भाजपला यश आलं नाही.
ममता बॅनर्जी विरुद्ध सर्व असा हा सामना आपल्याला पहायला मिळाला. मात्र, सर्वांना तोंड देणारी ही बंगालची वाघीन नक्की आहे कोण? त्यांनी त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात कधी केली? हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.
जन्म...
तृणमूल कॉंग्रेस संस्थापक आणि पश्चिम बंगाल च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी, 1955 ला कोलकाता येथे झाला.
शिक्षण...
ममता बॅनर्जी यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण जोगमाया देवी कॉलेज, दक्षिण कोलकाता येथून पूर्ण केलं. त्यानंतर ममता यांनी जोगेश चंद्र चौधरी कॉलेजमधून आपलं शिक्षण वकीलीच शिक्षण पूर्ण केलं.
राजकीय जीवनाला सुरुवात...
कॉलेजचं शिक्षण सुरु असतानाच ममता यांनी कॉंग्रेस सदस्य घेतलं. आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्या 1976 ते 1980 पर्यंत राज्यात महिला कॉंग्रेसच्या सचिव होत्या.
राष्ट्रीय राजकारणाला सुरुवात...
1984 मध्ये ममता बॅनर्जी यांनी सोमनाथ चॅटर्जी यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीचा पराभव केल्यानं त्या पहिल्यांदाच राष्ट्रीय वृत्तपत्राच्या हेडलाईनवर झळकल्या.
1989 मध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला. त्यामध्ये ममता यांचा देखील पराभव झाला. मात्र, लढवय्या स्वभावाच्या असणाऱ्या ममता पुन्हा एकदा 1991 ला मैदानात उतरल्या. आणि कोलकाता दक्षिण निवडणूक मतदारसंघातून त्या निवडून आल्या.
त्यानंतर 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 मध्ये त्या सतत विजयी झाल्या.
1991 ला पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्या केंद्रात मानव संसाधन विकास, खेळ आणि युवा तसंच महिला बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री झाल्या.
कॉंग्रेस सोबत मतभेद
राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस नेतृत्वाशी ममता यांचं फारसं पटलं नाही. आणि त्यांनी त्यानंतर 1997 मध्ये तृणमूल कांग्रेस ची स्थापना केली.
1999 मध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला सत्तेत बसवण्यासाठी वाजपेयींना मदत केली. त्या रेल्वेमंत्री झाल्या.
2000 मध्य़े ममता बनर्जी यांनी त्यांचं वैयक्तिक पहिलं रेल्वे बजट संसदेत सादर केलं.
2001 मध्ये त्यांचं भाजपसोबत वाजलं. पुढील निवडणूका त्यांनी कॉंग्रेससोबत लढवण्याचा निर्णय घेतला.
2004 मध्ये केंद्रात UPA चं सरकार आलं. या सरकारमध्ये त्यांनी कोळसा आणि अन्न मंत्री पद सांभाळलं.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवत ममता बॅनर्जी लोकसभेत पोहोचल्या. त्या मनमोहन सिंह सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्या. मात्र, त्या या पदावर फक्त 2 वर्षेच राहिल्या
2011 मध्ये कॉग्रेस आणि तृणमूल कॉग्रेस ने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हापासून त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.