Home > News Update > उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ट्वीटनंतर राजकीय वादंग, संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ट्वीटनंतर राजकीय वादंग, संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ट्वीटनंतर राजकीय वादंग, संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया
X

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर भाजपकडून मुख्यमंत्री काय भूमिका घेणार अशी विचारणा केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,माकड आपला पूर्वज आहे. माकडाला आपण वंशज मानलंच पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः सावरकरवादी आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचं तेजच त्याला जाळून टाकेल, असे थेट उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले.

गेल्या अनेकवर्षापासून सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते महानायक राहतील, असे राऊत म्हणाले. तसेच सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरून कोणाला पुसता येणार नाही, असे देखील त्यांनी निक्षूण सांगितले.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत एक आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर काही क्षणातच हे ट्विट व्हायरल झाले. त्यामुळे सर्वच स्तरातून राऊत यांचा निषेध केला गेला. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले. मात्र भाजपने आक्रमक होत राऊत यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली. राऊत यांनी माफी न मागितल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातळखर यांनी केली होती.

Updated : 23 Oct 2021 7:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top