Home > News Update > तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे
X

आपला काही महत्वाचा ऐवज हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपण पोलिसात तक्रार करायला जाता. परंतू काही वेळेस पोलिसांकडून तक्रार नोंदवुन घेताना दिरंगाई केली जाते. पोलिसांकडून कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र (Affidivate) करून आणण्यास सांगितले जाते त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. अशा प्रकारे पोलिस तक्रारदाराची अडवणुक करतात. ही बाब आक्षेपार्ह असल्याचे सांगत मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे नागरीकांना दिलासा दिला आहे.

गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही आहे तरी देखील पोलिसांकडून शपथपत्राची मागणी केली जाते व तक्रारदाराची अडवणूक केली जाते. ही बाब जर पुन्हा निदर्शनास आली तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर खातेनिहाय कारवाई करणार असल्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढले आहेत.

हे आहे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी काढलेलं परिपत्रक


मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या या आदेशानंतर तरी सामान्य तक्रारदारांची पोलिसांकडून होणारी अडवणुक थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 28 Aug 2021 7:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top