Home > News Update > #Lakhimpur Kheri : आरोपी आशीष मिश्राला घेऊन SIT घटनास्थळी

#Lakhimpur Kheri : आरोपी आशीष मिश्राला घेऊन SIT घटनास्थळी

#Lakhimpur Kheri : आरोपी आशीष मिश्राला घेऊन SIT घटनास्थळी
X

उ. प्रदेशातील (Uttar Pradesh ) लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur khiri)आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी सध्य़ा SIT तपास करत आहे. ३ ऑक्टोबर रोजी घडलेल्य़ा घटनेच्या चौकशी प्रक्रियेचा भाग म्हणून SITने अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचे पुत्र आशीष मिश्राला (Ashish Mishra) गुरूवारी घटनास्थळी नेले होते. त्या दिवशी नेमके काय घडले अगदी तसाच प्रसंग इथे पुन्हा रचण्यात आला. शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेत पुतळ्यांचा वापर करण्यात आला.

आशीष मिश्रासह माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दास यांचा भाचा आणि आशीष मिश्राचा मित्र अंकीत दास, अंकीतचा गनर लतीफ उर्फ काले आणि आणखी एक कर्मचारी शेखर भारती यांनाही या ठिकाणी आणण्यात आले होते. ज्या गाडीने शेतकऱ्यांना उडवले त्या मागच्या गाडीत अंकीत दास होता. ३ ऑक्टोबर रोजी ज्या महिंद्रा थार कारने शेतकऱ्यांचे चिरडले होते ती कार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या नावावर होती. या घटनेनंतर आशीष मिश्राला सात दिवसांनी अटक करण्यात आली. आशीष मिश्रा याचा जामीनअर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळला आहे. त्याआधी १२ झालेल्या चौकशीनंतर आशीष मिश्राला अटक करण्यात आली होती. पण या चौकशी दरम्यान घटना घडली तेव्हा आपण कुठे होते ते आशीष मिश्रा पोलिसांनी सांगू शकलेला नाही. पण अजय मिश्रा यांनी मात्र आपला मुलगा त्या ठिकाणी नव्हता असा दावा केला आहे.

Updated : 14 Oct 2021 8:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top