Home > News Update > TET- पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेकडे मोठं घबाड

TET- पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेकडे मोठं घबाड

म्हाडा परीक्षेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांंना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे सापडले. त्यानंतर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. तर अटकेनंतर तुकाराम सुपे यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्यात पोलिसांना ८८ लाख रूपये रक्कम आणि दागिने आढळले होते. मात्र आज पोलिसांनी टाकलेल्या दुसऱ्या धाडीत तब्बल २ कोटींहून अधिक रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.

TET- पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेकडे मोठं घबाड
X

पुणे : राज्यात एकापाठोपाठ परीक्षेतील गैरव्यवहारांची प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य भरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारानंतर म्हाडा परीक्षेच्या पुर्वसंधेला पोलिसांच्या तत्परतेमुळे गैरव्यवहार उघडकीस आले. तर म्हाडा परीक्षेच्या गैरव्यवहाराची चौकशी करताना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार सायबर पोलिसांनी उघडकीस आणला. तर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे यांना १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडे मारलेल्या पहिल्या धाडीत ८८ लाख रूपये रोख रक्कम आणि दागिने सापडले होते. तर आज दुसऱ्या धाडीत दोन हजार, पाचशे आणि शंभर रूपयांच्या नोटा मिळून दोन कोटी रूपये आढळून आले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली.

राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. तर त्यांच्यावर टीईटी परीक्षेत पैसे घेऊन उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

सायबर पोलिसांनी आज पुन्हा तुकाराम सुपे यांच्या घरी धाड टाकत तब्बल दोन कोटी रूपयांहून अधिक रोख रक्कम आणि लाखो रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपे यांच्या घरी धाड टाकायच्या आधी त्याच्या मेहुण्याने आणि पत्नीने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती. पण चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं असता मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे.

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी तपास चालू असताना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. तर टीईटी भरती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची जबाबदारी देखील जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे देण्यात आली होती. परीक्षा पास होण्यासाठी पैसे दिलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिका रिकाम्या ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तर पेपर तपासताना पैसे दिलेल्या उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहून त्यांना पास केलं जायचं, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर नापास झालेल्य विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी अर्ज करायला सांगून त्या उमेदवारांना पास केलं जायचं. तर यासाठी 35 हजार ते 1 लाख रूपये घेतले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Updated : 20 Dec 2021 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top