Home > News Update > आंबोलीजवळ एका हॉटेलमधील पार्टीवर धाड ; मुलींचा डान्स,दारूसाठा जप्त

आंबोलीजवळ एका हॉटेलमधील पार्टीवर धाड ; मुलींचा डान्स,दारूसाठा जप्त

आंबोलीजवळ एका हॉटेलमधील पार्टीवर धाड ; मुलींचा डान्स,दारूसाठा जप्त
X

सावंतवाडी // आंबोलीजवळ असलेल्या एका हॉटेलवर सावंतवाडीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर यांच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. यात कर्नाटक येथील एका कंपनीच्या पार्टीत चक्क मुली डान्स करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या पार्टीत मोठ्या प्रमाणात मद्यसाठाही आढळून आला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली.

आंबोलीच्या जवळच एक हॉटेल असून तेथे कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी पार्टी होती , कंपनीचे तीस अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते याठिकाणी मोठा मद्यसाठा होता तसेच काही मुली या पार्टीत डान्स करत असल्याचं बोललं जातं आहे.पोलीसांकडून धाड टाकल्यानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान या कारवाईबाबत स्थानिक पोलीसांना माहिती देण्यात आली नव्हती. पोलीस उपअधीक्षक काटेकर यांनी सावंतवाडी आंबोली या मार्गाने न जाता दुसऱ्याच मार्गाने जाऊन ही कारवाई केली.

Updated : 23 Nov 2021 7:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top