गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधीचा गंडा ; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
X
डोंबिवली // डोंबिवली पूर्वेत राहणारा चकेश जैन याने पैसे गुंतवणूक केल्यावर जास्तीचे व्याजदर मिळेल असे, सांगून डोंबिवलीतील अनेक नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी टिळकनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
जास्तीचे व्याजदर मिळेल या लालसेपोटी अनेक नागरिकांनी आरोपी चकेश जैन यांच्याकडे पैशाची गुंतवणूक केली होती. मात्र, व्याजदर तर सोडा गुंतवणूक केलेली रक्कम देखील या नागरिकांना परत मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेतली.
यासंदर्भात आदर्श गावडे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला असता तो उत्तरप्रदेशला पळून गेला असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली.
गुंतवणूक केलेली रक्कम आरोपी शेअर मार्केटमध्ये गुंतवत होता अशी माहिती डोंबिवलीचे एसीपी जयराम मोरे यांनी दिली आहे.दरम्यान पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरी केला आहे.