Home > Top News > पोलीसानेच फोडलं ATM मशीन !

पोलीसानेच फोडलं ATM मशीन !

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्नांचा मास्टरमाईंड आता उघड झाला असून पोलिसच बॅंक एटीएम मशीन फोडणारा सापडला आहे...

पोलीसानेच फोडलं ATM मशीन !
X

सांगली जिल्ह्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांला अटक करण्यात आली आहे. सचिन यशवंत कोळेकर असे या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याच्या सोबत त्याचा सहकारी सुहास शिवशरण याला जत पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील डफळापूर मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. शनिवारी 29 जुलै रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून त्यातील पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता.

परंतु तो प्रयत्न फसल्याने अज्ञात चोरट्यानी एटीएम मशीन चार चाकी गाडीला बांधून बाहेर रस्त्यावरती टाकले होते. यावेळी त्यांनी सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावरती स्प्रे मारला होता. मात्र त्यांना ते एटीएम फोडता न आल्याने आणि लोकांची रहदारी बघून ते रात्री पळून गेले होते. या प्रकरणी जत पोलीस तपास करत होते. जत पोलिसांनी या घटनेचा मागील दोन दिवसापासून अत्यंत शिताफीने तपास करून, मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासात धक्कादायक माहिती समोर आली.

या चोरीमध्ये सध्या कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सचिन कोळेकर व त्याचा साथीदार सुहास शिवशरण या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिन कोळेकर व सुहास शिवशरण यांना आज जत न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated : 2 Aug 2022 10:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top