Home > News Update > मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलीस बंदोबस्त तैनात

मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलीस बंदोबस्त तैनात

मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलीस बंदोबस्त तैनात
X

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीवरून लाखोंच्या संख्येने पायी मुंबईला निघाले आहेत त्याचा आजचा मुक्काम हा नवीमुंबईत म्हणजेच मुंबईच्या हद्दीवर असणार दरम्यान यावेळी कोणतही वेगळी घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतलेली असल्याची प्रतिक्रीया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरांमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईचे पोलीस सज्ज झाले असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजाराचा फौज फाटा हा मैदानात उतरला आहे. मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या घटना घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे मोर्चा व्यवस्थित रित्या मुंबईकडे रवाना करण्यात येणार" असल्याचं मिलिंद भारंबे यांनी सांगितले आहे.

Updated : 25 Jan 2024 10:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top