Home > News Update > Red sandal wood Smuggler : सांगलीत पुष्पा, अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

Red sandal wood Smuggler : सांगलीत पुष्पा, अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

पुष्पा चित्रपटातील कथानकाप्रमाणे सांगली जिल्ह्यातून एका रक्तचंदन तस्कराला अटक करत पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर त्याच्याकडून तब्बल अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.

Red sandal wood Smuggler : सांगलीत पुष्पा, अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त
X

सांगली जिल्ह्यातील मिरज येथून पोलिसांनी रक्तचंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करत तब्बल आडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

दक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुन मुख्य भुमिकेत असलेल्या पुष्पा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटामुळे रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय समोर आला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरजमधून वनविभागाने दोन कोटी 45 लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त करत अटकेची कारवाई केली.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथून पकडण्यात आलेला रक्तचंदन तस्कर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी करत होता. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच सापळा रचून 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदन जप्त केले. तर या रक्तचंदनाची किंमत दोन कोटी 45 लाख रुपये इतकी आहे.

रक्तचंदनाची तस्करी करणारा यासिन इनायतउल्ला याला ताब्यात घेतले आहे. तर पुष्पा स्टाईलने रक्तचंदन कर्नाटकातून मिरज येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम, उपअधिक्षक अशोक वीरकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वनविभागाच्या सहाय्याने सापळा रचला. तर KA-13-6900 या टेम्पोतून रक्तचंदनाची तस्करी सुरू होती. अखेर पोलिसांनी लावलेल्या सापळ्याला यश आले. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन कोटी 45 लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त करत यासिन इनायतउल्ला याला अटक करण्यात आली.

Updated : 31 Jan 2022 2:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top