तुम्ही कुठेही राहा, address प्रुफ शिवाय मिळणार गॅस कनेक्शन, काय आहे मोदी सरकारची योजना
X
'पंतप्रधान उज्ज्वला योजने' च्या दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात येणार आहेत. यासाठी 'सेल्फ डिक्लेरेशन' मागवण्यात आलं आहे. म्हणजे स्थलांतरित मजूरांना त्यांचा कायमचा पत्ता नसतानाही गॅस कनेक्शन दिलं जाणार. त्यासाठी स्थलांतरित कामगार कुटुंबांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही.
बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, 'सेल्फ डिक्लेरेशन' हा काय प्रकार आहे आणि त्याअंतर्गत कोणती माहिती घेतली जाणार आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना PM Ujjwala Yojana च्या वेबसाईटवर 'सेल्फ डिक्लेरेशन' उपलब्ध आहे. तसेच या फॉर्ममध्ये अर्जदाराला त्याचे नाव, आधार क्रमांक, वडिलांचे नाव, पतीचे नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची नाव, त्यांचे आधार क्रमांक आणि जन्मतारीख असा सगळा तपशील द्यावा लागणार आहे.
कसं करणार अप्लाय?
सर्वप्रथम उज्ज्वला योजनेच्या अधिकृत (pmuy.gov.in) पोर्टलला भेट द्यायची आहे.
आता 'Apply For New Ujjwala 2.0 Connection' वर क्लिक करा.
तुम्हाला खाली तीन पर्याय दिसतील, इंडियन, भारत पेट्रोलियम आणि एचपी
तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
आता मागितलेली माहिती भरून सबमीट करा.
कागदपत्र पडताळणीनंतर, एलपीजी गॅस कनेक्शन तुमच्या नावाने जारी केलं जाईल.