Home > News Update > केजरीवालांनी मोदींना हात जोडले, म्हणाले मला झोप येत नाही...

केजरीवालांनी मोदींना हात जोडले, म्हणाले मला झोप येत नाही...

पश्चिम बंगालचा दौरा रद्द करत मोदींनी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बातचित केली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना हात जोडत आपल्या मागण्या मांडल्या वाचा काय म्हटलंय केजरीवाल यांना...

केजरीवालांनी मोदींना हात जोडले, म्हणाले मला झोप येत नाही...
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा त्यांचा नियोजित प्रचार दौरा सोडून देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

पंतप्रधान साहेब, कृपया फोन करा. तुमच्या फोनमुळे दिल्ली पर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा कारखाना नाही म्हणून दिल्लीच्या 2 कोटी लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही. जर दिल्लीत ऑक्सिजनचा कारखाना नाही तर ज्या राज्यात कारखाना आहे. ते राज्य दिल्लीला ऑक्सिजन देणार नाहीत का?

जर एखादं राज्य दिल्लीच्या वाटेचा ऑक्सिजन थांबवत असेल तर मी केंद्र सरकारला कोणाला फोन लावू. मला रात्रभर झोप येत नाही. मंत्री मदत करत आहेत. मात्र, त्यांचे देखील हात टेकले आहेत.

पंतप्रधान साहेब आपण वेळेवर बैठक बोलावली आहे. मी दिल्लीच्या लोकांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो, आता जर कठोर पाऊल उचलली नाहीत. तर वाईट परिस्थिती होईल. मी मुख्यमंत्री असूनही काही करू शकत नाही. ऑक्सिजन मध्येच रस्त्यात अडवला जात आहे. केंद्राने सर्व ऑक्सिजन प्लांट स्वत:कडे हस्तांतरीत करावेत. आणि ऑक्सिजन पुरवठा करताना आर्मीच्या देखरेखीखाली करण्यात यावा. उडीसा आणि पश्चिम बंगाल येथून विमानाने ऑक्सिजन दिल्ली देण्यात यावा.

अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

लसीचा भाव वेगवेगळा का?

1 मे पासून 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार लस खरेदी करु शकतात. असं जाहीर केलं आहे. मात्र, केंद्राला लस 150 रुपये आणि राज्याला लस 400 रुपये. देशात लसीची किंमत वेगवेगळी कशी? लसींची किंमत समान असायला हवी. अशी मागणी देखील यावेळी केजरीवाल यांनी केली आहे.

Updated : 23 April 2021 1:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top