PM Modi - छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून नौदलाचा नवा ध्वज
छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत बनवलेल्या भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.
X
संपुर्ण भारतीय बनावटीच्या INS विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोची येथे नौदलात दाखल झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. त्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज 2 सप्टेंबर रोजी इतिहास बदलणारे काम केले आहे. भारताने गुलामीचे एका चिन्हाचं ओझं आपल्या काळजावरून उतरवलं आहे. आजपासून भारतीय नौदलाला एक नवा ध्वज मिळाला आहे. मात्र आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामीची ओळख दिसत होती. परंतू आतापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरीत नौदलाचा नवा ध्वज समुद्र आणि आसमंतात फडकणार आहे, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले.
त्यानंतर पुढे बोलताना मोदी म्हणाले की, कधी रामधारी सिंह दिनकर यांनी आपल्या कवितेमध्ये म्हटले होते की, नवीन सूर्य की नवीन प्रभा, नमो नमो नमो, नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, या ध्वजवंदनेसह नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना हा ध्वज समर्पित करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.