चंद्रयान-३ च्या लँडिंग पॉईंटला शिवशक्ती पॉईंट नाव, पंतप्रधान मोदींची घोषणा
X
चंद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्रावर लँड झाल्याने देशाने जल्लोष साजरा केला. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांची भेट घेत मोठी घोषणा केली आहे.
चंद्रयान -३ यशस्वीरित्या लँड झाले. त्यानंतर रोव्हर आणि लँडर यशस्वीरित्या काम करत असल्याचेही समोर आले. मात्र ते लँडर ज्या ठिकाणी यशस्वीरित्या लँड झाले त्या लँडिंग पॉईंटला नाव देण्यात आले नव्हते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी त्या लँडिंग पाँईंटला शिवशक्ती पॉईंट नाव देण्याची घोषणा इस्त्रोतून केली आहे.
चंद्रयान-३ जेव्हा चंद्रावर लँड झाले त्यावेळी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रयान -३ चे यशस्वी लँडिंग व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाहिले होते. मात्र आता पंतप्रधान मोदी देशात आल्यानंतर त्यांनी इस्त्रोला भेट देत शास्त्रज्ञांचे कौतूक केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्या पॉईंटला चंद्रयान लँड झाले त्या पॉईंटला शिवशक्ती पॉईंट नाव देण्याची घोषणा केली.
याआधी जेव्हा चंद्रयान-१ यशस्वीरित्या लँड झालं होतं. त्यावेळी त्या लँडिंग पॉईंटला जवाहर पॉईंट नाव देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्याकडून घराणेशाहीच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे.