Home > News Update > Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी घोषणा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या 80 व्या कार्यक्रमात क्रीडा दिनानिमित्त भाषण देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी ऑलम्पिक आणि पॅराऑलम्पिकमध्ये भारताच्या यशाबरोबरच युवकांनी खेळासाठी दाखवलेली आवड ही मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली आहे. असं मत व्यक्त केलं आहे. आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

खेळाबाबत बोलताना "सब खेलें और सब आगे बढ़ें" अशा घोषणेचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यात त्यांनी सबका साथ, सबका विकास यासह 'सबका प्रयास' ही घोषणा दिली आहे.. संधीचा फायदा घेत तरुणांनी विविध प्रकारच्या खेळातही प्रभुत्व मिळवले पाहिजे. तसेच गावोगावी क्रीडा स्पर्धा सातत्याने चालू राहिल्या पाहिजेत.

मेजर ध्यानचंद सारख्या लोकांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. बऱ्याच वर्षांनी देशात असा कालखंड आला आहे की, कुटूंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो, सर्व लोक एक मनाने खेळाप्रती लोक मनाने एकत्र होत आहेत.

अध्यात्म आणि तत्त्वज्ञान

मन की बात दरम्यान पीएम मोदींनी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावरही चर्चा केली. ते म्हणाले, 'आज जगातील सर्व लोक भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाबद्दल खूप विचार करत आहेत, तेव्हा आपली ही महान परंपरा पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे.

Updated : 29 Aug 2021 3:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top