Home > News Update > लहान मुलांच्या लसीकरणाला वेग द्या : पंतप्रधान

लहान मुलांच्या लसीकरणाला वेग द्या : पंतप्रधान

देशातील वाढत्या कोरोना संसर्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाला वेग द्या : पंतप्रधान
X

किशोरवयीन मुलामुलींसह, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

आजपासून (ता.१०) सुरू होणारी ही लसीकरण मोहीम 'मिशन मोड'वर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यामध्ये मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला हजेरी लावली. देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटमुळे देशाच्या काही भागांमध्ये संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे ही बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उपस्थित होते. बैठकीत विमान वाहतूक सचिव, गृह सचिव, कॅबिनेट सचिव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांचा समावेश होता.

पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याचे आणि किशोरवयीन मुलांसाठी "मिशन मोड" मध्ये लसीकरण मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले.

देशात 15-18 वयोगटातील 31 टक्के किशोरवयीन मुलामुलींना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य-संबंधित मार्गदर्शनाची उपलब्धता वाढवण्यासाठी नॉन-कोविड आरोग्य सेवा आणि टेलीमेडिसिनचा लाभ घ्यावा याची खात्री करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.

Updated : 10 Jan 2022 8:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top