Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लसीकरण, संजय राऊतांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लसीकरण, संजय राऊतांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लसीकरण, संजय राऊतांचा टोला
X

कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्समध्ये कोरोनावरील लस घेतली. पंतप्रधानांनी स्वत: लसीकरणाचा फोटो ट्विट केला आहे.


"आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी", असं मोदींनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस न घेतल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. तसेच मोदी लस कधी घेणार? असा सवाल सोशल मीडियाद्वारे मोदींना विचारला जात होता.

कोणती लस घेतली मोदींनी ?

मोदींनी भारत बॉयोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला आहे.

यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्याने जनतेत विश्वास वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी अधिवेशनात सरकारला घेरण्यापेक्षा चर्चा केली पाहिजे, ते महाराष्ट्रसाठी आणि जनतेसाठी फायदेशीर ठरेल. असेही आवाहन त्यांनी केले आहे.

काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाच्या फोटोवरून मोदींवर निशाणा साधला आहे. "डोक्यात फक्त निवडणूकाच...गळ्यात आसामी गमछा,

एक नर्स केरळची तर दुसरी पुडुचेरीची आणि दाढी बंगालच्या टागोरासारखी" अशी टीका तांबे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीतील एम्स रूग्णालयात पोहचले. तिथे त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.

Updated : 1 March 2021 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top