Home > News Update > इकडे भारत बंद तिकडे मोदींच्या परदेश वाऱ्या सुरू

इकडे भारत बंद तिकडे मोदींच्या परदेश वाऱ्या सुरू

इकडे भारत बंद तिकडे मोदींच्या परदेश वाऱ्या सुरू
X

पंतप्रधान झाल्यापासून जगभरातील 60 देशांमध्ये 108 परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल 15 महिन्याच्या खंडानंतर आता पुन्हा परदेश प्रवास करणार आहेत. आज सकाळी त्यांनी दिल्ली विमानतळावरून बांगलादेशला उड्डाण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक परदेशी दौरे करणारे भारतीय पंतप्रधान ठरले असून त्यांनी आत्तापर्यंत जवळपास जगभरातील 60 देशांमध्ये 108 परदेश दौरे पंतप्रधान झाल्यापासून केले आहेत. यावरून त्यांना समाजमाध्यमात खिल्ली देखील उडवली जात आहे.

मार्च 2020 पासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीचे संक्रमण सुरू झाले. त्यानंतर मोदींच्या जगभ्रमणाला ब्रेक मिळाला. जवळपास पंधरा महिने त्यांनी एकही परदेश दौरा केला नव्हता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून प्रदेश दौऱ्याला खंड पडलेला हा सर्वात मोठा कालावधी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा आजपासून सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावरून ढाकाकडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांचा १५ महिन्यानंतर परदेशी दौरा असणार आहे.

बांगलादेशचा ५० वा स्वातंत्र्य दिन आहे. यासाठी बांगलादेशने कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हा पहिला परदेशी दौरा आहे. यापूर्वी मोदी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझील दौर्‍यावर गेले होते.


बांगलादेशच्या स्थापनेत भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, म्हणूनच या विशेष प्रसंगी भारताचे पंतप्रधान सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी ढाकामध्ये उत्सवासारखं वातावरण आहे. पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी बर्‍याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. बांगलादेशात या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय परेड मैदानावर होणार आहे. तसंच बंगबंधू आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मोदी सावर येथील राष्ट्रीय शहीद स्मारकात जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. मोदींच्या या परदेश दौऱ्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 26 March 2021 10:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top