कोलकाता आगीत 9 लोकांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
कोलकाता आगीत 9 लोकांचा मृत्यू, ममता बॅनर्जी यांनी दिली घटनास्थळी भेट, मोदींनी व्यक्त केलं दु:ख
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 March 2021 9:12 AM IST
X
X
कोलकाता येथे लागलेल्या भयंकर आगीत आत्तापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रल कोलकाता येथील स्ट्रैंड रोड वरील एका बिल्डिंग ला सोमवारी लागलेल्या आगीत काही कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा समावेश आहे.
दुर्घटना स्थळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी देखील भेट दिली आहे. या बिल्डिंगमध्ये रेल्वेचं कार्यालय होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
'कोलकाता येथे लागलेल्या आगीत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मी दु:खी आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडित कुटुंबाबांचं सात्वन केलं असून जखमी लोकांना लवकरात लवकर आराम पडावा.'
असं म्हटलं आहे.
Updated : 9 March 2021 9:15 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire