Home > News Update > उ.प्रदेशातील अपघाताबाबत पंतप्रधानांना वेदना, पण चिरडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शब्द नाही

उ.प्रदेशातील अपघाताबाबत पंतप्रधानांना वेदना, पण चिरडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शब्द नाही

उ.प्रदेशातील अपघाताबाबत पंतप्रधानांना वेदना, पण चिरडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शब्द नाही
X

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष यानेच शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ठार झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली देखील वाहिलेली नाही. यावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी उत्तर प्रदेशातील एका अपघातामध्ये ठार झालेल्या लोकांना आदरांजली वाहत मदतीची घोषणा केली आहे.

पण या ट्विटनंतर मोदींवर टीका होते आहे. लखीमपूर मधल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे शब्द नाहीत का असा सवाल काहींना विचारला आहे.

Updated : 7 Oct 2021 12:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top